Gopinath Munde Shetkari Apghat Vima yojana :
सदर सुधारित योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहीतीधारक खातेधारक शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले.
कोणताही एक सदस्य ( आई, वडील शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती) असे एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजना दिनांक 9 डिसेंबर 2019 पासून राबविण्यात येत आहे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अनुदान :
1. अपघाती मृत्यू रुपये 2 लाख.
2. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे रुपये 2 लाख.
3. अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये 2 लाख.
4. अपघातामुळे एक डोळा अथवा एक पाय किंवा एक पाय रिकामी होणे रुपये 1 लाख.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima yojana 2023 :
सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्त साठी कार्यवाहीत असलेले योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सहानुभ्र अनुदान योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल.