New Shabari Gharkul Yojana 2023 :
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य शासना मार्फत करण्यात आलेल्या सन 2011 च्या सर्वेक्षणानुसार या योजनेस पात्र अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे.
मित्रांनो ही योजना फक्त अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा, ग्रामीण विकास, यंत्रणा, या सर्व ठिकाणी योग्य तपासणी कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते.
या योजनेची उद्दिष्टे
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांकडे राहण्यासाठी पक्के घर नाही आणि ते मातीच्या झोपडीत, कच्चे विटा, मातीचे घर, निवारासाठी बनवलेल्या तात्पुरती झोपडीत राहतात. अशा पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून दिले जाणार आहे.
या घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपये पर्यंत इतके आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच मनरेगा अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र ठरणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा