या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र ठरणार आहे ते पहा :
1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे.
3. सद्यस्थितीला पक्के घर नसावे.
4. घरकुल बांधकामासाठी जागा गावठाण मधील असावे.
5. या योजनेसाठी दिव्यांगांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा :
1. ग्रामपंचायत ठराव.
2. अर्जदार लाभार्थी यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले जातीचे प्रमाणपत्र.
3. तहसीलदार यांच्या स्वाक्षरी असलेले उत्पन्नाचे दाखले.
4. रेशन कार्ड.
5. लाभार्थी जागेचा उतारा आठ अ असावा.
6. रहिवासी प्रमाणपत्र.
7. आधार कार्ड.
8. बँक पासबुक इत्यादी.
वरील सर्व कागदपत्रासह शबरी आदिवासी घरकुल योजनेचा प्रस्ताव ग्रामसेवक मार्फत पडताळणी करून पंचायत समितीकडे सादर करायचे आहे.
या योजनेबाबत संपर्क कोठे करावे
शबरी आवाज योजना करिता अधिक माहितीसाठी मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या ठिकाणी संपर्क करून आपण या योजनेविषयी अधिक माहिती मिळवू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद!
अशाच योजनेच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा