Land Record Maharashtra 2023 : मित्रांनो, आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली जमीन आपल्या नावावर करताना किंवा एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती तुमच्या नावावर करण्यासाठी किती खर्च येतो? तुम्हाला तर माहीतच आहे. बहुतांश शेतकरी खेड्यापाड्यातील असल्यामुळे जमीन नावावरती करताना (Land Transfer) त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली जाते.
या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या अंतर्गत वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर फक्त 100 रुपयांचे स्टॅम्प पेपर वर करता येणार आहे.
Land Record Maharashtra 2023 :
जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त आपल्याला 100 रुपये लागणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.