Mahadbt

कृषी विभागाचे स्पष्टीकरण

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणाऱ्या महाडीबीटी वरील अर्जाची 15 मे नंतर सोडत होणार नाही. असा मेसेज गेल्या आठ दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरत आहे. मात्र हा संदेश खोटा आणि खोडसाळपणाने प्रसारित केला जात आहे. असा कोणताही आदेश आयुक्तालय अथवा शासन स्तरावर देण्यात आलेल्या नाही. असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतीविषयक साहित्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी वर अर्ज नोंदणी सुरू ठेवावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या अर्जाचा विचार करून आठ ते पंधरा दिवसाला सोडत काढली जाते. सोडत होणार नाहीत अशा संदर्भात कसलाही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करणे सुरू ठेवावे.

अशा प्रकारची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो आपण महाडीबीटीवरील विविध योजनांची अर्ज प्रक्रिया ही सुरू ठेवावी व त्या योजनेचा लाभ घ्यावा.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top