Janani Suraksha Yojana : नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने राज्यातील गर्भवती महिलांसाठी उपयुक्त अशी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची सोनोग्राफी ही मोफत होणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही राज्य शासनाची नवीन योजना जेणेकरून गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी मिळणार आहे व या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Janani Suraksha Yojana
राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Janani Suraksha Yojana)
गरोदरपणात बाळाचा योग्य विकास होणे हे आई आणि बाळाचा आरोग्यासाठी आवश्यक आहे.त्याची वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातील तसेच शहरातील महिला अनेकदा पैशा अभावी सोनोग्राफी करत नाहीत, परिणामी बाळाचा गर्भात नीट विकास झाला आहे की नाही किंवा त्यात काही व्यंग आहे का? त्याचे वेळेवर निदान होऊ शकत नाही. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने (Janani Suraksha Yojana ) ही नवीन योजना सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा
जननी सुरक्षा योजना
खासगी दवाखान्यात सोनोग्राफीसाठी सुमारे दोन हजार रुपये खर्च येतो. बस एवढेच शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील महिलांना रुग्णालयाच्या खर्चातून निश्चितच दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात गरोदर महिलांची सोनोग्राफी करून मुलाचा विकास योग्य प्रकारे होत आहे की नाही हे जाणून घेतले जाते.Janani Suraksha Yojan
सोनोग्राफी मध्ये मुलाची वाढ होत नसेल तर त्यानुसार मुलावर उपचार केले जात असल्याचे अहवालात दिसून येते. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता वंचित गट आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना जिल्हास्तर, तालुकास्तर, नगरपालिका, स्तरावरील शासकीय रुग्णालयामध्ये मोफत सोनोग्राफी सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. Janani Suraksha Yojan
सरकारने घेतलेल्या महिलांसाठी या नवीन योजनेविषयी अनेक महिलांनी सरकारचे आभार मानले आहे.
भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.
धन्यवाद !
अशाच योजनेच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा