Income Certificate Maharashtra : नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की उत्पन्नाचा दाखला शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बरेचदा उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला तहसीलदार कडे जावे लागते व तेथे अर्ज करून पुढील काही दिवसांनी आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळतो.
Income Certificate Maharashtra
परंतु आज आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की आपण घरबसल्या मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला कशाप्रकारे काढू शकतो व त्याची प्रक्रिया कशी आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Income Certificate Maharashtra
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला महा ई सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच तलाठी यांच्याकडे उत्पन्नाचा अहवाल लागतो. हा अर्ज आपण मोबाईल वरून सुद्धा भरू शकतो. आपले सरकार महाऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- तलाठी उत्पन्न दाखला
- दोन फोटो रेशन कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- रहिवासी घोषणापत्र इत्यादी
उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा
1. तुम्हाला दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल वरती खालील वेबसाईट उघडायचे आहे.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
2. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्याची पर्याय दिसेल त्यावर नवीन यूजर येथे नोंदणी करा.
3. नोंदणी करण्यासाठी आपल्याला जिल्हा व मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा या बटन वरती क्लिक करायचे आहे.
4. व त्यानंतर त्याखाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल त्यामध्ये लक्षात राहील असा पासवर्ड टाकून घ्या.
5. व लगेच पुढे आपल्याला जन्मतारीख टाकण्यासाठी सांगितले जाईल व त्यानंतर नोंदणी करा या बटणावर क्लिक करायचे आहे.
आपले नोंदणी यशस्वी होईल. त्यानंतर आपण पुन्हा होम पेज सुरू करायचे आहे व नोंदणी करतेवेळी टाकलेली युजरनेम आणि पासवर्ड टाकायचे, तसेच जिल्हा निवडून लॉगिन करा.
उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा
1.लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील त्यामधून आपण महसूल विभाग येथे क्लिक करायचे आहे.
2. त्यामध्ये तुम्हाला उपविभागामध्ये revenue service हा ऑप्शन निवडावा लागेल.
3. महसूल सेवांमध्ये उत्पन्न दाखला हा ऑप्शन दिसेल तो निवडा आणि पुढे जा या ऑप्शन वर क्लिक करा.
4. पुन्हा तुम्हाला उत्पन्न दाखला पर्याय निवडावा लागेल आणि पुढे जा या बटन वरती क्लिक करावे लागेल.
5. त्यानंतर मोबाईल मध्ये एक फॉर्म सुरू होईल त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्न दाखला किती वर्षाचा काढायचा आहे ते निवडावे लागेल
6. अर्जदाराची वैयक्तिक माहिती अर्जदाराचा पत्ता कुटुंबाची माहिती उत्पन्न दाखला कोणासाठी काढायचा आहे व इत्यादी माहिती व्यवस्थित अचूक माहिती भरावी.
7. शेती असेल तर त्याबद्दल माहिती भरावी लागेल त्यानंतर उत्पन्नाबद्दलची माहिती भरावी व आपण तलाठी उत्पन्न दाखला सोबत जोडत असाल तर तलाठी अहवाल पर्याय निवडावा.
8. अटी मान्य आहे चौकोनात क्लिक करावे व त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड लागेल.
व फक्त काही तासानंतर आपल्याला उत्पन्न दाखला डाऊनलोड करण्यासाठी मेसेज येईल
तर अशा पद्धतीने आपण उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज भरू शकता.
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.