Sugar Cane cut Machine 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की आत्ताचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे, परंतु अजून देखील ऊस तोडणी हे कामगारांच्या हातीस केले जाते.Sugar Cane cut Machine 2023
आता ऊस तोडणी साठी देखील यंत्रणा विकसित करण्यात आलेले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे व त्यांना दुसरे पीक घेण्यासाठी स्वतःची रान देखील लवकर मोकळे करता येत आहेत.
Sugar Cane cut Machine 2023
परंतु ऊस तोडणी यंत्रणा ची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ते घेणे शक्य नाही, हेच लक्षात घेऊन शासनाने या संबंधित एक महत्त्वपूर्ण आस शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता ऊस तोडणी यंत्रणा घेण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान हे मिळणार आहे व मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे.
चला तर मग पाहूयात याचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे व शासन निर्णय कशाप्रकारे आहे व अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला देखील याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Sugar Cane cut Machine 2023
शासन निर्णय पहा
शेतकरी बंधूंनो, राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना 100 टक्के हे अनुदान मिळणार आहे. हे यंत्रणा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने सन 2022-23 जमा450 व सन 2023-24 मध्ये 450 अशा एकूण 900 ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. एकूण प्रकल्पासाठी रुपये 321.30 कोटी एवढ्या प्रकल्प किमतीस मान्यता देण्यात आलेली आहे व या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे.
अर्ज कुठे करायचा ते पहा
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या ऊस तोडणी यंत्रणासाठी अर्ज करायचा असेल तर याची जी अर्ज प्रक्रिया आहे ते पुढील काही दिवसांमध्ये महाडीबीटी या पोर्टल वरती सुरू होणार आहे. त्याचबरोबर महाडीबीटी या पोर्टल वरती ज्या शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्रणासाठी अर्ज केले आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने आपल्यासाठी राबवलेली आहे.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.