Aadhar Card Login : नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे सध्याच्या घडीला आधार कार्ड हे आपले अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कामासाठी आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते. त्यामुळे आपल्या आधार कार्ड वरील माहिती व पत्ता अचूक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण फक्त आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी म्हणून आधार केंद्रावर जायला परवडत नाही.
Aadhar Card Login
बंधूंनो किती चांगले होईल ना आपल्याला घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता व इतर माहिती दुरुस्त करणे शक्य झाले तर, बंधूंनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. कशाप्रकारे आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील माहिती बदलू शकतात हे आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Aadhar Card Login
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला घरबसल्या आपल्या आधार कार्ड वरील माहिती बदलण्यास मदत होईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Aadhar Card Login
बंधूंनो, आपल्या सर्वांना आधार कार्ड ची उपयुक्त माहित आहे. सर्व सरकारी व खाजगी कामांसाठी सर्वप्रथम आपणास आधार कार्ड ची मागणी केली जाते. आपल्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आपल्या अस्तित्वावर शंका उपस्थित होते.
आधार कार्ड आपल्याला कशाप्रकारे उपयुक्त ठरते ते पाहूया
1. एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पडताळणी करण्यासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता भासते.
2. एखाद्या व्यक्तीच्या निवासाची किंवा रहिवासाची पडताळणी करण्यासाठी देखील आपल्या आधार कार्डची आवश्यकता भासते.
3. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी देखील आधार कार्ड ची आवश्यकता भासते.
अशा विविध प्रकारच्या कामासाठी आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते.
आधार कार्ड वरील मजकूर कसे दुरुस्त करायचे ते पाहूया :
तसे पाहिले तर आधार कार्ड वरील आपल्या माहितीमध्ये बदल करणे फार सोपे आहे; परंतु त्यासाठी आपल्याला पुराव्यांची आवश्यकता भासते परंतु काही वेळा आपल्याकडे पुरावा नसल्याने आधार केंद्रावर जावे लागते.
पण जर का तुम्हाला तुमच्या पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर कुठलाही आधार केंद्रावर न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या पत्त्यामध्ये सुधारणा करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने पत्ता कसे बदलायचे ते पाहूयात :
1.आपल्या आधार कार्ड वरील माहिती मध्ये सुधारणा करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
https://myaadhaar.uidai.gov.in/
2. यानंतर होम पेज वरील माय आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3. आता त्यामधील अपडेट युवर आधार या सेक्शन वर क्लिक करून आता आपल्यासमोर आलेल्या लॉगिन या शब्दावर क्लिक करावे.
4. यानंतर आपल्यासमोर आलेले पेजवर आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन वर क्लिक करावे.
5. आता आलेल्या सूचना पूर्ण वाचून घ्या व ऍड्रेस हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा.
6. त्यानंतर तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा.
7. आवश्यक ते बदल करून नवीन पत्त्याची खात्री झाल्यानंतर सबमिट रिक्वेस्ट वर क्लिक करून आपल्यासमोर बदलासाठीचे शुल्क 50 रुपये भरण्यासाठी पेमेंट पोर्टल ते upi नेट बँकिंग किंवा इतर पर्यायांचा वापर करून 50 रुपये शुल्कांचा ऑनलाईन भरणा करायचा आहे.
अशा पद्धतीने आपण आपल्या घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा