Apang Pension Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेविषयी थोडी माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती अपंग व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे माध्यमातून अपंग व्यक्तींना दरमहा पेन्शन मिळणार आहे. हे पेन्शन किती मिळणार आहे व या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा व यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. Apang Pension Yojana Maharashtra
याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुमच्याही ओळखीचे कोणी अपंग व्यक्ती असेल तर तुम्ही या लेखाद्वारे त्यांची मदत करू शकता. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Apang Pension Yojana Maharashtra :
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रात अपंग पेन्शन योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ अपंग लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होणार आहे. अपंग व्यक्ती रोजगार प्राप्त करू शकत नाहीत.
अपंगत्वामुळे त्यांचे जीवन परावलंबी होते. राज्यातील अपंग लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अपंग दिव्यांग पेन्शन योजना राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार लाभार्थ्याला राज्य सरकारकडून प्रति महा 1500 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. Apang Pension Yojana Maharashtra
अपंग पेन्शन योजनेचा लाभ व फायदे पहा :
1. अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रति महा 1500 रुपयांची पेन्शन देणार आहे.
2. 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
3. ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक इत्यादी
अर्ज कसा व कुठे करावा ते पहा :
1. अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
2. या कार्यालयामध्ये तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल.
3. फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागेल.
4. तुमचा फॉर्म या कार्यालयामध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
5. अर्जाची पडताळणी नंतर तुमची पेन्शन सुरू केली जाईल.
अशा पद्धतीने आपण या योजनेसाठी अर्ज भरू शकता व या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या ओळखीच्या अपंग व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल.