Free school uniform scheme : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मिळणार आहे.Free school uniform scheme
चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे व यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
Free school uniform scheme
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या मुला मुलींना याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.
विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजना ही राबवली आहे. या योजनेअंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश हे मिळणार आहे.Free school uniform scheme
मोफत शालेय गणवेश वाटप
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
तसेच सण 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत एका गणवेशा करिता 300 रुपये याप्रमाणे प्रति विद्यार्थ्याला दोन गणवेशाचे लाभ दिले जाणार आहे.
योजनेचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत स्थानिक स्तरावर गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने राबवली आहे. आपण जर पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेत असाल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल.
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद !