Indira Gandhi National Old Age Pension Scheme Maharashtra

Indira Gandhi National Old Age Pension Scheme Maharashtra:-

इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना:-

या योजने अंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन दिले जाईल. केंद्र शासनाने विहीत केलेल्या निकषांनुसार राज्यातील द्रारीद्रय रेषेखालील नोंद असलेले ६० व ६५ वर्षावरील निराधार वृध्द व्यकती या योजनेमध्ये पात्र राहतील.

इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर माहिती आपल्या मराठी भाषेत:-

1) योजनेचे नाव:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना.

2 )योजनेचा प्रकार :- केंद्र पुरस्कृत योजना

3) योजनेचा उददेश:- राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन.

४) योजनेच्या प्रमुख अटी:-

दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते.

यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.

५) अर्ज करण्याची पध्दत:-

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करु शकतो.

    ६) संपर्क कार्यालयाचे नाव:-

जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय.

     -:या योजनेचे फायदे:

प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

लाभार्थी:-

दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.

आवश्यक कागपत्रे:-

उत्पन्नाचा दाखला – द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये त्या व्यकती / कुटूंबाचा समावेश असल्या बददलचा साक्षांकीत उतारा.

पत्ता:-गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा.

संपर्क व्यक्ती:-अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा.

मिञ आणि मैत्रिणींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल..आणी ते आपल्या जवळच्या, ओळखीच्या लोकांना या योजने चा फायदा करुन देतील.

 

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top