शेत जमीन 100 रुपयांमध्ये नावावर कशाप्रकारे करायचे ते पहा
सद्यस्थितीमध्ये जमीन नावावर करणे म्हणजे एखादी लढाई खेळण्यासारखेच आहे. कारण जमीन नावावर करताना अनेक अडचणी समोर येतात, त्याचप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया वेळ खाऊ असल्याने आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी व्यक्तींकडून पैसे घेतले जात असल्या कारणाने या गोष्टींकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. परिणामी ही प्रक्रिया किचकट होते. त्यानंतर विपरीत परिणाम आपल्या संपत्ती किंवा जमिनीवर होत असते.
Land Reacord बद्दलचा जुना शासन कायदा काय सांगतो ते पहा
जमीन नावावर करण्यासंदर्भातील जर तुम्ही जुना शासन निर्णय किंवा कायदा पाहिला तर, त्या ठिकाणी तुम्हाला वडिलोपार्जित जमीन कुटुंबातील मुलांच्या किंवा मुलींच्या नावावर करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावानुसार मुद्राक्ष शासनाला द्यावा लागतो.
परंतु एखाद्या गरीब शेतकऱ्याला हे रक्कम परवडण्याजोगी नव्हती, त्यामुळे शासनाकडून यामध्ये बदल करून नवीन निर्णयानुसार फक्त 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.