MahaDBT farmer registration :. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे योजना ही राबवल्या जातात व त्या योजनांचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो.MahaDBT farmer registration
परंतु त्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी वेबसाईटवर आपले आयडी ही रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु अनेक शेतकऱ्यांना हे रजिस्ट्रेशन करता येत नाही.आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपल्याला कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करता येणार आहे, तेही फक्त 5 मिनिटांमध्ये.
MahaDBT farmer registration :
चला तर मग पाहूयात आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाईटवर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करता येणार आहे व यासाठी कोणती प्रक्रिया आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपली आयडी रजिस्ट्रेशन करता येईल व विविध योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.MahaDBT farmer registration
महाडीबीटी रजिस्ट्रेशन :
महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी मोबाईल वरूनच नोंदणी करू शकतात. तसेच अर्ज/फॉर्म देखील भरू शकतात.
या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुळे शेतकऱ्याचे वेळ ही खूप वाचत आहे व ऑनलाईनच्या माध्यमातून अगदी काही वेळामध्ये विविध योजनांसाठी अर्ज भरता येत आहे. व ऑफलाइन स्वरूपात असल्याकारणाने शेतकऱ्यांचा वेळ खूप जात होता व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे इत्यादी कामांसाठी खूप कालावधी देखील जात होता.MahaDBT farmer registration
परंतु सध्याच्या या ऑनलाइन रजिस्ट्रेशन मुळे आपण घरबसल्या कोणत्याही नवीन महाडीबीटीवरच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अगदी काही क्षणामध्ये भरू शकता.
महाडीबीटी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन कसे करावे ते पहा :
रजिस्ट्रेशन करणे एकदम सोपे आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे.
1. रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल मध्ये खालील लिंक वर क्लिक करून वेबसाईट उघडा
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
2. यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या संपूर्ण नाव टाकावे.
4. आपण तेथे आपले नाव किंवा आधार कार्ड नंबर देखील टाकू शकता.
5. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड टाकावे लागेल.
6. त्यानंतर आपला सुरू असलेला एक मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर वर एक OTP मिळेल ते तेथे टाकून वेरिफाय करा.
6.Captcha कोड टाकून नोंदणी वरती क्लिक करा.
यानंतर आपली नोंदणी यशस्वी होईल, त्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टल वरती लॉगिन करून आपले अर्ज सादर करू शकता.
अशाप्रकारे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी वरती रजिस्ट्रेशन करून महाडीबीटीच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद !