महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 | Maharashtra vidhwa penshan yojna 2023

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023 |Maharashtra vidhwa penshan yojna 2023.|सरकारी योजना २०२३

 

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपले महाराष्ट्र सरकार हे नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात आज आपण अशाच एक महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.
ही योजना आहे विधवा महिलांसाठी आणि ह्या योजनेचे नाव आहे विधवा पेंशन योजना. सरकार कडून ही योजना विधवा महिलांसाठी राबवली जाते. याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे म्हणजेच या योजनेचे लाभ काय त्यासाठी पात्रता काय आहे यासाठी अर्ज कोठे करावा लागतो आणि कसा करावा लागतो, यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे.
मित्रांनो आपल्या राज्यातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या आणि विधवा महिलांसाठी सरकारने ही योजना लाभली आहे तरी या योजनेचा सर्व विधवा महिलांनी लाभ घ्यावा या योजनेच्या मार्फत प्रत्येक विधवा महिलांना सरकारकडून प्रति महिना ६०० रूपये अनुदान मिळते
यावरूनच त्या महिला त्यांच्या जीवनातील छोटा मोठा खर्च भागू शकतात आणि त्यांच्या जीवनातील काही प्रमाणात अडचणी कमी होतात.

विधवा स्त्रिया म्हणजेच त्यांना पाठिंबा देणार कोणी नसत स्वतः बरोबर पूर्ण परिवाराकडे लक्ष द्यावे लागते आणि कष्ट करून ते त्या परिवाराची जिम्मेदारी उचलतात मग त्यांचे कष्ट थोड्या प्रमाणात कमी व्हावं आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने ही विधावा पेन्शन योजना सुरू केलेली आहे.

ही योजना अशाच आर्थिक दुर्बल असलेल्या महिलांसाठी राबवली जात आहे ज्यांच्या घरी पुरुष नाहीये आणि पूर्ण घराची जिम्मेदारी एकट्या महिलेने उचलली असते अशा विधवा महिलांसाठी ही योजना सरकारने काढली आहे. या योजनेतून अशा महिलांना प्रति महिना ६०० रूपय�

आवश्यक कागदपत्रे :

बँकेचे पासबुक

पासपोर्ट साईज फोटो,

उत्पन्न प्रमाणपत्र,

वय प्रमाणपत्र,

पती मृत्यू प्रमाणपत्र,

जातीचे प्रमाणपत्र

,मोबाईल नंबर,

अर्ज कोठे व कसा करावा :

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, त्यांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करू शकता ज्यावेळी तुम्ही शासनाच्या अधिकृत या वेबसाईटवर जाल तर तिथे एक मेन पेज ओपन होईल त्या वेबसाईटवर महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना याचा अर्ज राहील तो अर्ज तुम्ही डाऊनलोड करून घ्यावा.

व त्यांची प्रिंट काढून घेणे आणि त्या प्रींटला डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेली महिती ही व्यवस्थित भरून घ्यावी. अर्ज भरून घेतल्यानंतर आपण हा अर्ज व्यवस्थीत भरला आहे का नाही तर पूर्ण पणे चेक करून घ्यावा व नंतर वरील सर्व कागदपत्रे त्याला जोडावी . अर्ज भरल्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन जमा करावे.

मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा.

ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top