Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023:-
महात्मा ज्योतिबा फुले योजना काय आहे ?
विम्याची रक्कम रु. एका कुटुंबासाठी वार्षिक 1.5 लाख. या योजनेत औषधे, शस्त्रक्रिया, उपचार, निदान आणि सल्लामसलत यांचा खर्च समाविष्ट आहे . योजनेंतर्गत आरोग्य विमा संरक्षण कौटुंबिक फ्लोटर आणि वैयक्तिक आधारावर प्रदान केले जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय / निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो, याच बरोबर यावेळी संपूर्ण जगामध्ये कोविड -19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे तसाच राज्यामध्ये सुद्धा करोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला होता, त्यामुळे शासनाने या योजनेच्या अंतर्गत, योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर सर्वच नागरिकांना या करोना महामारीच्या संकटामध्ये नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये आणि जनतेला आरोग्य विषयक हमी देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कालावधी शासनाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, वाचक मित्रहो आपण या लेखात महाराष्ट्र सरकारच्या या आरोग्य योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता, ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन अर्ज, तसेच या योजनेंतर्गत येणाऱ्या आजारांची यादी, अंगीकृत रुग्णालयाची यादी हि संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी:-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे, सुरुवातीला महाराष्ट्र राज्यात सरकारने जीवनदायी योजना सुरु केली होती ज्यामध्ये फक्त गंभीर आजारांचा खर्च समाविष्ट होता, या योजनेमध्ये त्रुटी असल्यामुळे सरकारने नंतर या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून आंध्रप्रदेश प्रदेशाच्या यशस्वी ‘आरोग्यश्री’ आरोग्य योजनेच्या धर्तीवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2 जुलै 2012 ला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात सुरु करण्यात आली होती. या योजनेमध्ये सुधारणा करून 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया व थेरपी आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला, या योजनेमध्ये मुंबई, ठाणे, धुळे, नांदेड, अमरावती, गडचिरोली, सोलापूर, रायगड या आठ जिल्ह्यांमधील 52.37 लाख कुटुंबे समाविष्ट करण्यात आली होती.
या योजने अंतर्गत जुलै 2012 ते ऑक्टोबर 2013 या कालावधीत एक लाखहून अधिक प्रक्रिया पार पाडण्यात आल्या होत्या, या योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र शासनाने हि योजना नोव्हेंबर राज्यातील संपूर्ण 35 जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर हि राजीव गांधी जीवनदायी योजना दिनांक 1 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली, तसेच महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी एक कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे, या सेंटरच्या 32 लाईन्स व्दारे नागरिकांसाठी चोवीस तास कॉल करण्याची सुविधा उपलब्ध राहील, नागरिक या सुविधेचा उपयोग तीन प्रकारे करू शकतील आजारी रुग्णालयात उपचार घेताना व रुग्णलयातून घरी परतल्यानंतर आणि आजाराबद्दल नंतर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांच्या उपचार प्रक्रियेमधील आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब दोन लाख इतकी ठेवण्यात आली आहे, तसेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा वाढूऊन तीन लाख दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब करण्यात आली आहे, या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश राहील, तसेच या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचा उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी कोण पात्र आहे:-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी पात्र असतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी राज्यातील केवळ एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीच पात्र असतील.11-Mar-2023
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: नवीन अपडेट्स (28 जून 2023)
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023: राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहीर केलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आहे, जी सर्वसामान्यांसाठी सर्वात ‘निरोगी’ योजना आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थ्यांची ओळख प्रक्रिया :-
या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची ओळख महाराष्ट्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत लाभार्थी परिवारास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटीत कामगार ओळखपत्र, स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासनाने निर्धारित केलेल्या इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे ओळख पटविली जाईल, त्याचप्रमाणे हे ओळखपत्र मिळेपर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी परिवाराकडे असलेले वैध रेशनकार्ड किंवा केंद्र / राज्य शासनाने वितरीत केलेले कोणतेही एक ओळखपत्र जसे आधारकार्ड, मतदारकार्ड, वाहन चालक परवाना, इत्यादी आणि तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील आणि वर्धा विभागातील अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबासाठी त्यांच्याकडे असलेली पांढरे रेशनकार्ड किंवा 7/12 उतारा यांच्याव्दारे या योजनेंतर्गत उपचार मिळविण्यास पात्र असतील.
या व्यतिरिक्त शासन मान्य असलेल्या आश्रमशाळेतील मुले, अनाथ आश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब इत्यादी लाभार्थी घटकांची ओळख, राज्य शासन निर्धारित करेल अशा ओळखपत्राच्या आधारे पटविली जाईल.
या योजनेंतर्गत विमा संरक्षण आणि विमा हप्ता :-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्शुरंस कंपनीस अदा करण्यात येतो, सदर विमाहप्ता चार त्रैमासिक हप्त्यांमध्ये अदा करण्यात येतो. या योजनेंतर्गत लाभार्थी परिवारास दरवर्षी 2 लाख रुपये प्रमाणे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच या योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा 3 लाख रुपये प्रतीवर्ष इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच लाभार्थी परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तिंना या योजनेचा लाभ घेता येतो. या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असेल आणि तसेच योजनेंतर्गत रुग्णाला उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचाही समावाश असेल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय प्रोसिजर्स :-
या योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रोसिजर्स पैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजार्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या मध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार (Hip & Knee Replacement), सिकलसेल, अनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, इत्यादी साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजार्सचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला असून या मध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकरिता राखीव ठेवण्यात येत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत
आरोग्य प्रमाणपत्र
3 पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
रेशन कार्ड
वयाचा दाखला
उत्त्पन्न प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी किंवा महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना कार्ड मिळविण्यासाठी:-
तुम्हाला जवळच्या सामान्य, महिला/जिल्हा/नेटवर्क हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागेल. आरोग्यमित्र, जो योजनेचा प्रतिनिधी आहे, तुमच्यासाठी हेल्थ कार्ड मिळवण्याची सोय करेल.02-Feb-2023
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे:-
वेबसाईट च्या मेन मेन्यू मधील Network Hospitals या Option वर क्लिक करावे.
क्लिक केल्या नंतर तुमच्या सोयी प्रमाणे सुविधा निवडावी.
जिल्हानिहाय हॉस्पिटल लिस्ट पाहिजे असल्यास District wise Hospital या Option वर क्लिक करावे.
जर तुम्हाला Specially एखाद्या आजारासाठी हॉस्पिटल बघायचे असल्यास, Specialty Hospitals या Option वर क्लिक करावे लागेल.
Option निवडल्या नंतर तुमच्या समोर दुसरा tab उघडेल तेथे तुम्हाला जिल्ह्याचे किंवा विभागाचे नावे दिसतील.
तुमच्या विभागाचे किंवा जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून, तुम्ही तुमच्या जवळील सर्व हॉस्पिटल ची यादी पाहू शकता.
सोबतच त्याच tab मध्ये तुम्हाला हॉस्पिटल चा संपर्क क्रमांक पण दिलेला असतो, तुम्ही हॉस्पिटल ला थेट संपर्क करून तुमच्या शंकांचे समाधान करू शकता.
Hospital List क्लिक करा
Mahatma Phule Jan Arogya Yojana Disease List (आजार यादी)
शस्त्रक्रिया आणि आजार यादी हि एकाच ठिकाणी दिलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf (Surgery list, disease list)
कान, नाक, घसा शस्त्रक्रिया कर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडीओथेरपी कर्करोग त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभाल नेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोट व जठार शस्त्रक्रिया कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रिया प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतू विकृती शास्त्र जनरल मेडिसिन
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन हृदयरोग
नेफ्रोलोजी न्युरोलोजी
पल्मोनोलोजी चर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजी इंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी इंटरवेन्शनल रेडीओलोजी
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आम्ही या लेखात तुम्हाला दिली आहे. जर तुम्हाला अजूनही कोणत्या प्रकारची अडचण येत असेल, तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.
रुग्णालय- आरोग्य मित्र (MJPJA contact)
पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. 16565, वरळी पोस्ट ऑफिस
वरळी मुंबई – 4000018
महात्मा फुले जन आरोग्य योजना द्वारे किती रुपये दिले जातात 5,00,000 लाख रुपये रक्कम.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
टोल फ्री Contact Number – 1800 233 2200
अधिकृत वेबसाईट MJPJAY Login
नमस्कार बांधवांनो:-
तुम्हांला जर माहिती आवडली असेल तर हा लेख होईल तेवढे त्तुमचा मित्रांना आणि नातेवाईकांना पोहोचवा जेणेकरून सर्व जण या योजनेचा लाभ घेतील.
धन्यवाद….!