Majhi Kanya Bhagyashree Yojana
माझी कन्या भाग्यश्री योजना |
एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार व 2 मुली असतील तर 25 – 25 हजार , इथे करा अर्ज
माझी कन्या भाग्यश्री योजना:-
राज्यातील मुलीचे गुणोत्तर सुधारण्यासाठी व महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारमार्फत 01 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून, जर मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी केली, तर सरकारकडून मुलीच्या नावाने 50,000 रु. जमा करण्यात येतात. त्याचप्रमाणे जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केले नाही म्हणजेच नसबंदी केली नसेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलीच्या नावाने प्रत्येकी 25,000-25,000 रु. बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
योजना माझी कन्या भाग्यश्री योजना:-
राज्य:- महाराष्ट्र
योजनेची सुरुवात:- 1 एप्रिल 2016
अधिकृत वेबसाईट:- maharashtra.gov.in
लाभार्थी :- राज्याच्या मुली
उद्देश :- मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
व्दारा सुरु:- महाराष्ट्र सरकार
विभाग.:- महिला व बाल विकास विभाग
योजनेच्या अटी व शर्ती:-
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एकाच व्यक्तीच्या फक्त दोन मुलींनाच लाभ देण्यात येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी कमीत कमी दहावी पास असावी व अविवाहित असावी.
लाभ मिळवण्यासाठी 1ल्या मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी करणे अनिवार्य असेल.
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लाभ हवा असल्यास 6 महिन्याच्या आत नसबंदी करणे अनिवार्य असेल.
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा 01 लाखापर्यंत असावे.
नवीन धोरणानुसार उत्पन्न मर्यादा 7.5 लाख इतकी करण्यात आली आहे; म्हणजेच 7.5 लाख रुपये उत्पन्न असणारे लाभार्थीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असते.
या योजनेअंतर्गत शासनाकडून मुलीच्या नावाने रक्कम जमा केल्यानंतर त्या रकमेवरती कोणत्याही प्रकारचा व्याज दिला जाणार नाही. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला पूर्ण रक्कम देण्यात येईल.
योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर आईच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने बँक खाते उघडण्यात येईल. शासनाच्या ठरवलेल्या नियमावलीनुसार वेळोवेळी रक्कम मुलीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ती पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान १० वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणं आवश्यक आहे.
मिळतो १ लाखांचा विमामाझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावानं बँकेत संयुक्त खातं उघडलं जातं. यावर १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
आधार कार्ड
आई किंवा मुलीचं बँक खात्याचे पासबुक,
मोबाईल फोन नंबर,
पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी पुरावा
उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागेल.
कुठे कराल नोंदणीमाझी
कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करा. तपासाअंती तुमचा अर्ज योग्य आढळल्यास सरकार तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे देईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम:-
सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करतांना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील.या योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मिळणारी डीपॉझीट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीतकमी दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
हि योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल, त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना लागू राहील.
या योजनेमध्ये दोन प्रकारामध्ये योजनेचा लाभ मिळविता येतो एका मुलीच्याजन्मानंतर कुटुंबामध्ये मातेने किंवा पित्याने परिवार नियोजन करणे आणि तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये दोन अपत्यांच्या जन्मानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थींचे खाते जनधन योजनेंतर्गत आहे त्यांना जनधन योजनेंतर्गत असणारे लाभ आपोआप मिळू शकतील, हि योजना आधारसोबत जोडण्यात येईल. योजनेच्या ठराविक मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा मुलगी दहावी उतीर्ण नसल्यास या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना होणार नाही आणि मुलीच्या नवे बँक खात्यामध्ये असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या खात्यामध्ये जमा होईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील. परंतु ज्या परिवारामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
उद्दिष्टे:-
महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुरु करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारत्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीस प्रतिबंध घालणे तसेच मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये परंपरेनुसार मुलाच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतु मुलींच्या जन्मानंतर असे घडत नाही, जनमानसाची हि मुलींबद्दलची मानसिकता बदलविणे आणि त्यांना मुलींचे योग्य पालनपोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थीक मदतीव्दारे मुलीनी आपले शक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढे निर्माण होणारी मातांची पिढी हि शिक्षित होईल आणि त्यामुळे पुढे येणारी त्यांची मुले व मुली आरोग्यसंपन्न आणि शिक्षित निर्माण होईल व त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल, हा शासनाचा उद्देश आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश राज्यातील विषम लिंगअनुपात सुधारणे त्याच बरोबर मुलींचे प्रमाण वाढविणे, आणि तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये या आर्थिक मदतीचा उपयोग करता येईल, या योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षित आणि स्वयंपूर्ण बनविणे हा उद्देश शासनाचा आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे आणखी काही उद्देश:-
लिंग निवडीस प्रतिबंध करणे
बालिकांचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे. Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana (Features): योजनेचे स्वरूप देशातील मुलींचे सबळीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.
माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल.
- महराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे, आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट maharashtra.gov.in
नमस्कार मित्रांनो हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मिञ व नातेवाईकापर्यंत नक्की पोहोचा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेतील.
धन्यवाद….!