MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात फिरा फक्त 1100 रुपये मध्ये. एसटी ची नवीन योजना.

MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023   नमस्कार बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे मार्फत राबवले जाणारे एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

आपण जर फिरण्याचे शाॅकीन असाल तर ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता आपण या योजनेच्या माध्यमातून फक्त 1100 रुपये भरून संपूर्ण महाराष्ट् मध्ये फिरू शकता.चला तर मग पाहूयात एसटीची कोणती आहे ही नेमकी योजना, कोण कोण लाभ घेऊ शकतो, संपूर्ण या योजनेची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची सविस्तर माहिती मिळेल व आपण जर फिरण्याचे शाॅकीन असाल तर हे आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव काय आहे तर आवडेल तिथे कोठेही प्रवास ही जी योजना आहे सन 1988 पासून प्रवाशांसाठी महामंडळ राबवत आहे. या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या प्रवासाप्रमाणे चार दिवसाचा प्रवास पास देखील देण्यात येणार आहे.MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023

वाहतूक सेवेचा प्रकार काय तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे साधी बस असेल, जलद बस असेल, रात्र सेवा असेल, शहरी असेल, यशवंती असेल, आंतरराज्यसह आपण या पासच्या माध्यमातून फिरू शकतो.MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023

आता सात दिवसाच्या पासाचे मूल्य आणि चार दिवसाचे पासाचे मूल्य किती आहेत ते पहा

सात दिवसाच्या पासाचे मूल्य

प्रौढ व्यक्तींसाठी- 2040

मुला मुलींसाठी- 1025

चार दिवसाच्या पासाचे मूल्य

प्रौढ व्यक्तींसाठी- 1170

मुला मुलींसाठी- 585

वाहतुकीचा दुसरा प्रकार शिवशाही आंतरराज्य

सात दिवसाच्या पासाचे मूल्य

प्रौढ व्यक्तींसाठी- 3030

मुला मुलींसाठी- 1520

चार दिवसाच्या पासाचे मूल्य

प्रौढ व्यक्तींसाठी- 1520

मुला मुलींसाठी- 765

(बंधूंनो इथे जे मुलांचे दर दिले आहेत ते फक्त 5 वर्षापेक्षा मोठे व 12 वर्षापेक्षा आतील मुलांसाठी आहे)

या योजनेची काही अटी व नियम

1. या योजनेअंतर्गत सात व चार दिवसाचे पास दिले जातील.

2. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर देण्यात येईल.

3. या योजनेअंतर्गत प्रौढ व्यक्तींसाठी 30 किलो व बारा वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान विनामुल्य नेता येईल.

4. पास हरवल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही. व हरवलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.

5. सदरचा पास अहस्तांतरणीय राहील. पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.

6. प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणते नुकसान झाल्यात महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही.

7. आवडेल तेथे कोटेही प्रवास या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाची दिवसाची गणना 12 ते 24 अशी करण्यात येईल आणि पासाचे प्रवासी सदर पासाच्या 24 तासानंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवास तिकीट घेणे आवश्यक राहील.MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023 तर अशाप्रकारे राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांनी ही नवीन योजना राबवली आहे. आपण जर फिरण्याचे शाॅकीन असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आपण पास कुठे काढू शकतो

तर महा मंडळामध्ये जाऊन एसटी बसच्या इथे आवडेल तेथे कुठेही प्रवास हा पास तुम्ही काढू शकता.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top