New Ration Card Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता रेशन धान्य एवजी मिळणार पैसे, पहा आपल्याला मिळणार का.

New Ration Card Update :  नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाच्या अंतर्गत सर्व केशरी रेशन कार्डधारकांना पाच किलो अन्न म्हणजेच दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ यांची वाटप केले जाते. परंतु काही कालावधीपासून एपीएल कार्डधारकांना गहू आणि तांदूळ यांची वाटप केली जात नाही, त्यामुळे त्यांच्या अकाउंटवर आता पैसे पाठवण्यात येणार आहे.

New Ration Card Update :

मित्रांनो रेशन कार्ड मधील झालेले या नवीन बदलाचा रेशन कार्ड धारकांना कसा फायदा मिळणार आहे व कोणते रेशन कार्ड वाले यासाठी पात्रठरणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

New Ration Card शासन निर्णय :

28 फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला होता.   अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण पुरवठा यांच्या मार्फत 24/ 7/ 2015 मध्ये औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त होते. या सर्वांचा विचार करता राज्य शासनाने 2013 च्या शासन निर्णय अंतर्गत प्रत्येक कुटुंबामध्ये प्रति दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ यांची वाटप केली जात होते.

या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या धान्याची खरेदी ही नॉन NFSA या योजने अंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो आणि तांदूळ ते वीस रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करण्यात आले होते. परंतु आता या योजनेअंतर्गत हा साठा उपलब्ध होणार नसल्यामुळे राष्ट्रीय अन्न महामंडळाने त्यांच्या नियमानुसार 31 /5 /2019 व दिनांक 19/5/ 2022 यामध्ये काही नियमांत बदल करण्यात आले आहे.

धान्य एवजी किती रक्कम मिळणार आहे ते पहा :

मित्रांनो अन्नसुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत 2013 मध्ये समाविष्ट झालेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारकांना माही 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रति लाभार्थ्यांप्रमाणे 150 रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशी मान्यता अन्नसुरक्षा अधिक नियम यांनी घेतली आहे. तसेच वाडीवर रोख रक्कम देखील थेट हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या योजनेची रक्कम ही प्रथम महिला कुटुंब प्रमुखांच्या बैंक खाते मध्ये जमा करण्यात येणार आहे. महिला कुटुंबप्रमुखांची कोणत्याही बँकेमध्ये खाते नसल्यास अशा महिलांनी बँक खाते उघडण्याची सुरुवात करावी.

या योजनेचे लाभ घेण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे ते पहा 

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकावर नोंद असलेल्या सर्व सदस्यांच्या आधार कार्ड क्रमांक हे रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीचीच सलग्न  असणे गरजेचे आहे.

बंधूंनो आपल्याला जर याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर आपण जवळील रेशन कार्ड कार्यालय मध्ये जाऊन या योजनेविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top