Pradhanmantri Matru Vandana Yojna (PMMVY)

Pradhanmantri Matru Vandana Yojna (PMMVY) : 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना :-

 

(PMMVY) ही गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरु केलेली केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना अनेक मातांसाठी आता वरदान ठरतेय. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक प्रोत्साहन देऊन कुपोषणाचे परिणाम कमी करत वैद्यकीय उपचार आणि औषधांचा आर्थिक खर्च कमी करणे हा आहे. आतापर्यंत लाखो-करोडो महिलांनी या योजनेसाठी आपलं नावं नोंदवत योजनेचा फायदा घेतला आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांच्या खात्यात ५००० रुपये जमा करत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगणार आहोत.

जाणून घ्या PMMVY योजनेबद्दल:-

PMMVY योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलेच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवले जातात. यामार्फत लाभार्थ मातेच्या बँक खात्यात (DBT) तीन हप्ते जमा केले जातात. यातील पहिला १००० रुपयांचा हप्ता गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी ट्रान्सफर केला जातो, तर २००० रुपयांचा दुसरा हप्ता गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणीनंतर दिला जातो. यानंतर २००० रुपयांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता मुलाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर दिला जातो.

माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी, देशातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यू थांबावेत, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने (Ministry of Women and Child Development) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

योजनेची काही वैशिष्ट्ये-

1) राज्यातील 1 जानेवारी 2017 नंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

2) ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

3) नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ ग्राह्य राहील.

4) या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.असा करा अर्ज-मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना आपल्याजवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तीन फॉर्म (पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म) भरावा लागेल.त्यानंतर नोंदणीसाठी आणि पहिल्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड किंवा MCP कार्ड, गर्भवती महिला आणि तिचा पती यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याच्या तपशिलांसह रीतसर भरलेला फॉर्म 1A यांच्या ओळखीच्या पुराव्याची प्रत सबमिट करावी लागेल.दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थ्याने गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविलेल्या MCP कार्डच्या प्रतीसह रीतसर भरलेला फॉर्म 1B सादर करावा लागेल.तिसर्‍या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थ्याने मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिलांकडून रीतसर भरलेला फॉर्म 1C सह मुलाने लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे स्पष्टपणे दर्शवणारे MCP कार्ड सादर करावे लागेल.

मातृ वंदना योजनेत गरोदर मातांना किती आर्थिक लाभ मिळतो:-

या योजनेतून पहिल्या अपत्यासाठी गरोदर मातांना 5000 रुपयांची मदत तीन टप्प्यात दिली जाते.पहिल्या टप्यात गरोदरपणाची 150 दिवसांच्या आत नोंदणी केल्यास 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर 2 हजार रुपये मिळतात .तिसऱ्या टप्प्यात बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला 14 आठवड्यापर्यंतच प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा अखेरचा टप्पा दिला जातो. या योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पध्दतीने (Direct Beneficiary Tranfer मार्फत) त्यांच्या वैयक्तिक बँक, पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात.

आवश्यक कागदपत्रे:-

1 आधार कार्ड

२ रहिवासी दाखला

३ राशन कार्ड

४ बह्यारूपी तपासणी कार्ड

५ बँक पासबुक

संबंधित शासन संदर्भ,

शासन निर्णय:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी

माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी हि योजना राबविण्यात येते. गर्भवती व स्तनदा मातेला प्रसुतीपूर्वी व प्रसूती नंतर पहिल्या अपत्यासाठी नोंदणी करून पाच हजाराची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अनुदान लाभ व त्यांचे वितरण:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत (PMMVY) लाभ पात्र लाभार्थी महिलेस रुपये पाच हजार एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात (DTB) किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात खालील तीन टप्प्यात जमा केली जाते.

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा पहिला हप्ता 100

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दुसरा हप्ता 2000

किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा तिसरा हप्ता 2000

प्रसूती नंतर झालेल्या अपत्त्यांची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस आण लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जाईल.

लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रुपये 700 व रुपये 600 शहरी भागात लाभ अनुज्ञेय राहील.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना मातृ वंदना योजनेसाठी संपर्क:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा PMMVY लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी खालील प्रशासकीय स्तरांच्या आरोग्य केंद्रात संपर्क करता येतो.

ग्रामीण क्षेत्र:-

एएनएम (आरोग्य केंद्र सहाय्यक) पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र (Matru Vandana Yojana Form) 1 अ चा अर्ज देऊन अर्ज स्विकारतील व तो अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकची असते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

नगरपालिका क्षेत्र:-

प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.

महानगरपालिका क्षेत्र:

मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील. परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

ऑफिसियल वेबसाइट https://wcd.nic.in/

 

नमस्कार मित्रांनो :-

आपला आजचा लेख आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा आणि आपला व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा जेणेकरून येणारे प्रत्येक योजना बद्दल तुम्हाला माहिती होईल आणि तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल..आणि

होईल तेवढं तुमच्या मित्रांना देखील सांगा जेणेकरून त्यानं पण या योजनेबद्दल माहिती होईल आणि ते या योजनेचा लाभ घेतील..

 

धन्यवाद….!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top