Reshan card honar band

 रेशन कार्ड होणार रद्द 

केंद्र सरकार चा नविन निर्णय पहा  सविस्तर माहिती माराठीत:-Reshancard honar band

 

नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण रेशन कार्ड संबंधित महत्वाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो राज्य सरकारकडून रेशन कार्ड संबंधी महत्त्वाची नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार आता अनेक अपात्र रेशन कार्ड धारक कोण आहेत ते पाहू सविस्तर:-

राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो जर आपणही रेशन कार्डधारक असाल तर बातमी आपल्या कामाची आहे सरकार रेशन कार्ड धारकांची यादी तपासणी करत आहे, यादी सविस्तर पडताळल्यानंतर महाराष्ट्र सरकार शासनाच्या मते पडताळणी नंतर यामध्ये काही झोल किंवा गडबड आढळून आल्यास संबंधित रेशन कार्डधारकांची रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते..!

Ration card update:-
मुंबई न्यूज अपडेट:-

राज्यात मे महिना अखेर २ लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळले असून, छाननी नंतर यातील १ लाख २७ हजार रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत, सर्वाधिक 24 हजार 861 रेशन कार्ड हे नागपूर मध्ये असून सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ३८ इतकी आढळून आली एक घर एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

रेशनींग योजनेअंतर्गत स्वस्तदरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामागे चार चार रेशन कार्ड (शिधापत्रिका) काढल्याची बाब शासनाच्या लक्षात आलेली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
५ जून 2023 पर्यंत आपल्या राज्यात २ लाख ३२ हजार ७६६ डुप्लिकेट रेशन कार्ड असल्याचे आढळले आहे..!

• पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी

पिवळ्या व केशरी शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी एका कुटुंबा मागे सरकारने ठराविक शिधा निश्चित केलेला आहे एका घरामध्ये अनेक रेशन कार्ड गरज नसताना एका घरामध्ये दिल्या जाणाऱ्या शिद्याचे प्रमाणही वाढले होते.

• जर अंतोदय योजनेअंतर्गत एका कार्ड मागे ३५ किलो तांदूळ मिळत असेल तर घरामागे दिल्या जाणाऱ्या शिद्याचे प्रमाण ७०ते १०० किलो तांदूळ इतके वाढत होते
डुप्लिकेट कार्ड जाऊन सर्व कुटुंबातील सदस्य एकाच कार्डवर आल्याने आता प्रत्येकी घरामागचा शिदा ही कमी होणार असून त्याचा लाभ अनेक गरजूवंतापर्यंत पोहोचणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले..!

कोरोना काळामध्ये :- (कोरोना काळामध्ये) केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे नागरिकांना मोफत रेशन (शिदा) वाटप करण्यात येत होता त्या काळात अनेक अपात्र नागरिकांनी सुद्धा मोफत रेशन चा फायदा करुन घेतला. त्यावर करवाई करण्यासाठी आता शासनाने शिधापत्रिका संबंधी नविन नियम लागू केले आहेत. कोण असणार अपात्र :- ज्या शिधापत्रिका धारक व्यक्ती कडे स्व उत्पन्नातून घेतलेला 100 चौरस मीटरचा प्लॉट आहे किंवा घर आहे, आणि त्याच्याकडे चारचाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र परवाना आहे. सोबतच कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे; असे सर्व रेशनकार्ड धारक अपात्र ठरवण्यात आले आहेत. जर वरील निकष तुम्हाला लागू होत असतील तर कृपया तुमचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात जाऊन जमा करावे, अन्यथा कठोर कारवाई होऊ शकते रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद होणार…!

कायदेशीर कारवाई होणार:- केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार जर रेशकार्ड धरकाने स्वतहून कार्ड सरेंडर केलं नाही, तर चोकशी नंतर त्याच कर्ड रद्द केले जाईल.. आणि पूर्ण कुटुंबा विरोधात करवाई पण होउ शकते. येवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत तेव्हापासुनची त्याचा कडूंन भरपाई केली जाणार आहे. त्यामुळं आता प्रतेक रेशन कार्ड धारकांनी सर्व नियमाचे पालन करुन शासनाला मदत केली पाहिजे आता आपल्या केंद्र सरकारने खूप कडक नियम केले आहेत.. आणि आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे.. जेणेकरून ही जी मोफत रेशनिग व्यवस्था ही गोर गरीबांसाठी आहे. जे लोकं अर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी स्वतहून आपले कार्ड रद्द करावे जेणे करुन त्याचा लाभ गोरगरीबांना होइल..!

मित्रांनो या पोस्ट मार्फत दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना जेणेकरून ही खूप महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांची मदत होइल….! धन्यवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top