आरटीई 25% राखीव ऑनलाइन अर्ज सुरू | RTE 25% Online Admission Form Start 2024-25
RTE 25% Admission 24-25
नमस्कार, आजच्या या लेखामध्ये आपण RTE 25% Admission 24-25 संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.RTE Admission
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी 25% खाजगी शाळांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तींना आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवता येत आहे.RTE 25% Admission 24-25 या वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रिये संदर्भात सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कधीपासून कधीपर्यंत करता येणार आहे तसेच यासाठी कोणते महत्त्वाचे नियम आहेत .अटी आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. RTE Admission 2024
RTE 25% Admission 24-25 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
RTE 25% Admission 24-25 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 16 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे. यावर्षी या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे .आणि या बदलानुसार नवीन नियम लागू करण्यात आला आहे.RTE Admission 2024
आरटीई पोर्टलवर चार ते पाच वेळा मुदतवाढ देऊन शाळा नोंदणी सह रिक्त जागांची आकडेवारी अद्यावत केल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आरटीई अंतर्गत रिक्त असलेल्या 25 टक्के राखीव जागांसाठी 16 एप्रिल पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून 30 एप्रिल ही अर्जाची शेवटची तारीख आहे. आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्याअंतर्गत दुर्बल, वंचित व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांकरिता 25% रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात होते.
RTE 25% Admission 24-25 यावर्षी या प्रवेश प्रक्रियेला दोन महिने उशिरा सुरुवात झाली त्यातही दीड महिना शाळांची नोंदणी सुरू होती. पुणे जिल्ह्यात 78 हजार जागा. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील 5 हजार 153 शाळा नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये 77 हजार 927 जागा रिक्त आहेत.RTE Admission 2024
राज्यातील 77 हजार 947 शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25% रिक्त असलेल्या नऊ लाख बहात्तर हजार 823 अद्यावत केल्या आहेत. अशी माहिती शिक्षण संचालक यांनी दिले आहे.
RTE 25% Admission 24-25
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024
यावर्षी आरटीई ऍडमिशन 2024 25 साठी मोठा बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे आरटीई ऍडमिशन अंतर्गत शाळा निवडताना एक किलोमीटरच्या आतली शाळा निवडावी लागणार आहे. तरच विद्यार्थ्यांना या आरटीई ऍडमिशन 25% राखीव कोट्यातून शिक्षण घेता येणार आहे..