गृह कर्जावर व्याज किती व परतफेड करण्यासाठीची मुदत किती याविषयी पाहुयात :
शेतकरी बंधूंनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घर अथवा फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्या असलेल्या घराची दुरुस्ती करायची असल्यास त्यांना या गृह कर्जाचा लाभ मिळेल. नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 7.05% व्याजदराने 1 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज दिलेे जाणार आहे व तसेच कर्ज फेडण्यासाठी 15 वर्षे पर्यंत मुदत देखील दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ते पहा
1.ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
2.बँक ऑफ इंडिया मध्ये KYC खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी त्यांना या योजनेअंतर्गत या कर्जाचा लाभ मिळणार आहे.
3. आपल्याला या योजनेत अंतर्गत IT रिटर्न देखील देण्याची आवश्यकता नाही.
आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा