Star Kisan Ghar Yojana 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जाणार आहे.
चला तर मग पाहूयात शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी शासन किती कर्ज देणार आहे व कर्ज देण्याची पद्धत काय आहे? यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. (Star Kisan Ghar Yojana 2023)
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Star Kisan Ghar Yojana 2023 :
शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. परंतु या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हालाखीची आहे. त्यामुळे त्यांना आपले स्वतःचे स्वप्नाचे घर बांधणे किंवा दुरुस्त करणे देखील शक्य होत नाही.
हीच बाब लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया या बँकेने स्टार किसान घर योजना सुरू केली आहे या योजनेत बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी व घर दुरुस्त करण्यासाठी कमी व्याज दरात 1 लाख ते 15 लाख रुपये पर्यंत गृह कर्ज दिले जाणार आहे व कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात येणार आहे.