Vitthal Rukmini varkari vima yojana

 

 

Vitthal Rukmini varkari vima yojana:-

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना:-

या योजनेतून एखाद्या नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 50,000 रुपये दिले जातील. वारीदरम्यान एखादा वारकरी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.

 

वारकऱ्यांना ५ लाख रुपये मिळणार अनुदान, वारकरी विमा छत्र योजना Varkari Vima Yojana Maharashtra 2023

वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र सरकराकडून वारकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. वारीमध्ये अनेक घटना घडतात. त्यात अनेक वारकरी आपला जीव गमावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकराने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना:-

 

जे वारकरी पंढरपूर मधील आषाढी वारी मध्ये समाविष्ट झाले आहेत अशा सर्व वारकरी बंधुं करीता सरकारने विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे.

याबाबत अधिकृत घोषणा देखील एकनाथ शिंदे अणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत शासन पंढरपूर मधील आषाढी वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांना विमा संरक्षण देणार आहे.

 विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना विषयी माहिती:-

 

विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजनेअंतर्गत ज्या वारकरींचा वारी दरम्यान दुर्दैवाने मृत्यू होईल अशा वारकरी बांधवांच्या परीवारास पाच लाख रुपये इतके अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

अणि समजा एखाद्या वारकरी बांधवांला वारी दरम्यान अपंगत्व तसेच विकलांगता आली तर त्याला एक लाख रुपये इतके आर्थिक मदत केली जाणार आहे.

ज्या वारकरी बांधवांना वारी दरम्यान अंशत अपंगत्व आले त्यांना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.

वारी दरम्यान एखादा वारकरी आजारी पडला तर त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी शासन ३५ हजार रुपये देणार आहे.

वारीच्या कालावधी दरम्यान जे काही अपघात तसेच दुर्घटना वारकरी बांधवांसोबत घडुन येत असतात.ज्यात वारकरी बांधव गंभीर जखमी होतात त्यांना अपंगत्व विकलांगता येते किंवा काही वेळा त्यांचा ह्या दुर्घटनेत मृत्यू देखील होतो.

अशा वारकरी बांधवांच्या परीवारास आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही विठ्ठल रूक्मिनी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे.

ज्या वारकरींचा मृत्यू होतो किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व विकलांगता येते अशा वारकरी बांधवांच्या परीवारास एक आर्थिक मदत ह्या योजनेमुळे प्राप्त होणार आहे.

पण वारीच्या ३० दिवसांकरीता फक्त हे विमा संरक्षण दिले जाणार आहे.ही योजना राबविण्याचे काम मदत पुनर्वसन विभाग करेल.

२९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी आहे.त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून भक्तजण जाताना दिसुन येत आहेत.

अनेक भाविक पायपीट करत दूर अंतरावरून विठुरायाच्या दर्शनासाठी विशेषतः येत असतात.पण प्रवासा दरम्यान काही वारकरी बांधवांना दुखापत होते किंवा एखाद्या दुर्घटनेत अपघातात ते गंभीर जखमी होतात.काही जणांचा तर मृत्यू देखील होतो.

अशा वारकरी बांधवांना अणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही महत्वाची घोषणा केली आहे.

लाभार्थी पात्रता :

Varkari Vima Yojana Maharashtra

१) समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करणेसाठी सदरील समूहाचे स्तरावर प्रबंधन करणेसाठी आवश्यक ती यंत्रणा / समिती स्थापन करण्यात येईल.

२) सदरील योजनेकरिता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले (Unnamed Policy) विमा पत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरिता वारकरी हा गट विनिर्दिष्ट करण्यात येत आहे.

३) ज्यादिवशी विमाहप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून तीस दिवसांपर्यंत त्याची मुदत राहील.

४) एखादी व्यक्ती सदर कालावधीत मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा कसे याची पडताळणी करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालाकडून तसे प्रमाणित करण्यात येईल..

५) सदर विमापत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्याची संख्या समाविष्ट करण्यात येईल.

६) सदर विमापत्रकात खालील कारणांकरिता लाभ देय होणार नाही.

1) आत्महत्या वा तसा प्रयत्न

II) अमली अथवा मादक पदार्थांच्या अंमलाखाली मृत्यू

III) प्रसुती अथवा बाळंतपणादरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास

IV) गुन्हेगारी उद्देशाने कोणात्याही कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता

V गुप्त रोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता

VI) किरणोत्सर्ग,अणुभटटया, युध्द व बंड इत्यादी तत्सम कारणांमुळे उद्भवलेला मृत्यू किंवा विकलांगता.

७) विमा पत्राअंतर्गत वैद्यकीय उपचाराकरिता झालेला प्रत्यक्ष खर्च अथवा जास्तीत जास्त रु. ३५,०००/- विमारक्कम देय राहील

मित्रांनो , या पोस्टमध्ये आम्ही वारकरी छत्र योजना Varkari Vima Yojana Maharashtra या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि – वारकऱ्यांना ५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे , त्याचे अटी , नियम , पात्रता काय असेल , त्याचे उद्दिष्ट इत्यादी मला आशा आहे कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल

धन्यवाद !

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top